Crime News : तरुणीस पळवून लग्न करणाऱ्या मुलाच्या वडिलांचा मारहाणीत मृत्यू: ११ जणांवर गुन्हा दाखल..!

Crime News : मुलीला पळवून नेऊन नोंदणी पद्धतीने विवाह केल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांवर हल्ला झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिराम निवृत्ती कडू (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

Crime News : The father of the boy who abducted and married the young woman was beaten to death: A case has been registered against 11 people..!

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसाार, १२ ऑगस्ट रोजी हरिराम कडू यांना मुलगा मनोज याने यादवमळा येथील एका तरुणीला नाशिक येथे पळवून नेले होते आणि तेथे नोंदणी पद्धतीने तिच्याशी विवाह केला होता. या घटनेनंतर मनोजच्या कुटुंबीयांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात मनोज बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रत्यक्षात मनोजच्या प्रेम विवाहाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्थांद्वारे १८ ऑगस्ट रोजी गोड बोलून मुलीला घरी नेले. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत मुलगी पुन्हा मुलाच्या घरी पाठवली.

मुलगी सासरी पाठवल्यानंतर सासऱ्यांना केली बेदम मारहाण

मात्र, २८ ऑगस्ट रोजी मुलाचे वडील हरिराम निवृत्ती कडू हे निळवंडे येथून यादवमळा येथे परतले असता मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. तुमच्या मुलाने पळवून नेऊन आमच्या मुलीशी विवाह केल्याने आमची समाजात बदनामी झाली, असे बोलून हरिराम कडूंना पट्ट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कडू यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सविता हरिराम कडू यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरेश यादव, सुवर्णा यादव, वैभव यादव, मनोज यादव, विठ्ठल यादव, पद्माबाई यादव, उमेश काळे, पांडुरंग काळे, सुनील बबन काळे, साईराज काळे आणि प्रसाद काळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button