Crime News : स्वतःच्या दोन निष्पाप मुलांना विहिरीत फेकून खून करणाऱ्या बापाला न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा..!

Crime News : स्वतःच्या दोन लहान निष्पाप मुलांचा निर्दयीपणे खून करणाऱ्या गोकुळ जयराम क्षीरसागर (रा.आळसुंदे, तालुका कर्जत) या नराधम पित्याला श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भादंवि कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत न्यायालयाने त्याला पाच हजार रुपये दंडाचीही शिक्षा दिली आहे.

Crime News : The court awarded life imprisonment to the father who killed his two innocent children by throwing them into a well..!

घटनेचा तपशील असा आहे की, गोकुळ क्षीरसागर व त्याची पत्नी शितल यांच्यात घरगुती कारणांवरून वाद सुरु होते. त्याच वादातून गोकुळकडून ऋतुजा (वय ८) आणि वेदांत (वय ४) या दोन मुलांचा निर्दयीपणे खून करण्यात आला. ६ ऑगस्ट २०२३ रोजी गोकुळने मुलांना गावातून कटिंग करून आणण्याचे सांगून घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने घराजवळील शेतातील विहिरीत मुलांना फेकून दिले. या निर्दयी कृत्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. श्रीगोंदा सत्र न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी करत आरोपीला जन्मठेप व दंडाची शिक्षा दिली आहे.

कर्जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण पाटील यांनी या प्रकरणात आवश्यक असणारी सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. सरकारी वकील ॲड. श्री केसकर यांनी या खटल्याचा युक्तिवाद केला, तर पोलीस अंमलदार अशा खामकर यांनी त्यांना सहाय्य केले. दोन्ही पक्षांकडून सखोल युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी गोकुळ क्षीरसागर यास दोषी ठरवत त्याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button