Crime News : शिक्षकी पेशाला फासला काळीमा; नोकरी देण्याच्या आमिषाने चार शिक्षकांनी महिलेवर‎ केला अत्याचार…!

Crime News : लातूर शहरातील एका खळबळजनक घटनेत ३० वर्षीय महिलेवर नोकरीचे आमिष दाखवून लॉजमध्ये बोलावून सामूहिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर चार शिक्षकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी विठ्ठल रामराव हुगेवाड या शिक्षकाला अटक करण्यात आली असून, इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Crime News : Teacher’s profession has failed; Four teachers raped a woman with the lure of giving a job…!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथे शिक्षकांच्या अधिवेशनादरम्यान पीडित महिलेची ओळख विठ्ठल हुगेवाड याच्यासोबत झाली होती. त्यानंतर महिलेने नोकरीसाठी मदत करण्याची विनंती केली होती. १६ सप्टेंबर रोजी हुगेवाड याने व्हॉट्सॲपवरून महिलेचा संपर्क साधून तिला लातुरात नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून धाराशिव येथून बोलावले. दुपारी ४ वाजता ती लातूरमध्ये पोहोचली असता, हुगेवाड हा पांढऱ्या कारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिची वाट पाहत होता. कारमध्ये अन्य तिघे देखील उपस्थित होते. महिला कारमध्ये बसल्यानंतर हुगेवाड याने कार नांदेड रोडवरील कोळपा परिसरातील मॅजेस्टिक लॉजमध्ये नेली, जिथे चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

आरोपी विठ्ठल‎ हुगेवाड हा निलंगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक

सदर प्रकरणामध्ये पीडित महिलेने विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यावरून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींनी महिलेला नोकरीचे आमिष दाखवून लॉजमध्ये बोलावले होते आणि अत्याचार केला होता. “पीडित महिलेची तक्रार मिळताच आम्ही‎ गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेतला असता विठ्ठल‎ रामराव हुगेवाड या जिल्हा परिषद शाळा ‎निलंगा येथे शिक्षक असलेल्या आरोपीला अटक‎ केली आहे. त्याच्या अन्य तीन साथीदारांचा‎ शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक‎ होईल,” अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button