Crime News : शिक्षकी पेशाला फासला काळीमा; शाळेतच तिसरीच्या वर्गातील पाच मुलींचा विनयभंग…!

Crime News : अहमदनगर जिल्ह्यात खराडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी गैरवर्तन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बाळशीराम यशवंत बांबळे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने दुपारच्या सुट्टीत एका मुलीशी असभ्य वर्तन केले. घरी जाऊन मुलीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली. पालकांनी तातडीने शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत कळवले. मुख्याध्यापकांनी सर्व मुलींना बोलावून चौकशी केली असता, या शिक्षकाने इतर चार ते पाच मुलींशीही तसेच गैरवर्तन केल्याचे उघड झाले.

Crime News : Teacher’s profession has failed; Five girls in the third grade were molested in school…!

या धक्कादायक घटनेनंतर खराडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालकांनी या शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी शिक्षकाविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय प्रशासनाने देखील दोषी शिक्षकास तात्काळ निलंबित केले आहे. खराडी जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी गैरवर्तन केल्याच्या धक्कादायक प्रकरणात नवे तथ्य समोर आले आहे. आरोपी शिक्षक बाळशीराम यशवंत बांबळे हा नव्यानेच या शाळेत रुजू झाला होता आणि त्याने सुरुवातीपासूनच असे प्रकार करण्यास सुरुवात केली होती, असे समजते.

शाळांमध्येही असुरक्षित वातावरण; पालक वर्गात भीतीचे वातावरण

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ७५ आणि बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८,१२ अंतर्गत या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत. दरम्यान ज्या शिक्षकांच्या भरोशावर पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवतात, तेच आता असे कृत्य करत असतील तर कसे होणार, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button