Crime News : खळबळजनक प्रकार; सरपंचाच्या मुलाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीवर केला अत्याचार !

Crime News : मुंबईतील बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच, महाराष्ट्रात आणखी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सरपंचाच्या मुलाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने संपूर्ण विदर्भ हादरला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात सदर घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्या नराधमाला अटक देखील केली आहे.

Crime News : Sensational type; Sarpanch’s son abused the student on the pretext of giving a lift!

पीडित विद्यार्थिनी ही दररोज एसटीच्या बसने शाळेत ये-जा करत असे. शनिवारी सायंकाळी ती एसटी बसची वाट पाहत बसस्थानकावर उभी होती, तेव्हा गावात आलेल्या सरपंचाच्या मुलाने तिला हेरले. सरपंचाच्या मुलाने तिला घरी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देण्याची ऑफर दिली. विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला, परंतु नंतर तिने आपला निर्णय बदलला आणि आपल्या कुटुंबीयांना फोन करून ती त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली. मात्र, गावाच्या वाटेवर असताना आरोपीने दुचाकीचा मार्ग बदलला आणि तिला जंगलाच्या दिशेने नेऊन अत्याचार केला.

जंगलात नेऊन आरोपीने विद्यार्थिनीवर केला बलात्कार

गावाच्या जवळील मार्डीच्या जंगलात आरोपीने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या दुर्दैवी घटनेनंतर पीडितेने धैर्य दाखवत तातडीने कुटुंबीयांना संपर्क साधला आणि त्यांना घडलेली घटना सांगितली. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सरपंचाच्या मुलाला अटक केली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. बदलापूर येथील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर आणखी अनेक अत्याचाराची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समाजात वाढत्या अत्याचारांच्या घटनांनी नराधमांना कसलाही धाक राहिलेला नाही, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button