Crime News : जळगाव शहरात बियर बारमध्ये गोळीबाराची खळबळजनक घटना; सीसीटीव्हीवरून आरोपीची ओळख पटली…!

Crime News : जळगाव शहरातील कायम गजबज असलेल्या भास्कर मार्केटच्या परिसरात हॉटेल शालीमार या परमिट रूम व बियर बारमध्ये मंगळवारी रात्री मोठा वाद झाला. त्यातील एकाने गोळीबार केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार गोळीबार करणाऱ्याची ओळख पटली असून, भूषण सपकाळे असे त्याचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.

Crime News : Sensational incident of firing in beer bar in Jalgaon city; Accused identified from CCTV…!

हॉटेल शालीमारमध्ये गोळीबाराची घटना घडल्याची माहिती जळगाव शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान, जिल्हा पेठ पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील संशयिताची ओळख पटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल शालीमारमध्ये असलेल्या बियर बारमध्ये दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक वाद झाला. टोळीतील एकाने जमिनीवर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबाराच्या घटनेनंतर शालीमारमधील सर्व कर्मचारी कमालीचे भेदरल्याचे दिसून आले.

हॉटेलमध्ये गोळीबारानंतर रिकामा राऊंड आढळून आला

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने शालीमार हॉटेलला भेट देऊन पुढील तपासाला गती दिली. तेव्हा हॉटेलमध्ये गोळीबारानंतर खाली पडलेला रिकामा राऊंड आढळून आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यावर गोळीबार करणाऱ्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याचा शोध आता सुरू केला आहे.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button