Crime News : पुणे हादरले; बायकोचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो पाहुन शिक्षक नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल…!

Crime News : पुणे शहरात एक खळबळजनक घटना समोर आली असून, पती-पत्नीच्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतले आहे. पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो पतीपर्यंत पोहोचल्याने या वादाला नवी दिशा मिळाली. फोटो पाहताच शिक्षक पतीचा संताप अनावर झाला आणि त्यानंतर जे घडले त्यामुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनेमागील नेमकी कारणे शोधली जात आहे.

Crime News : Pune shook; The teacher’s husband took extreme step after seeing his wife’s photos with her boyfriend…!

बिहारचा मूळ रहिवाशी असलेला संशयित आरोपी राजीव कुमार हा गेल्या तीन वर्षांपासून पत्नीसोबत घटस्फोटाची केस लढत होता. तणावाच्या स्थितीत असतानाच त्याच्यापर्यंत पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो पोहोचले, ज्यामुळे तो आणखी संतापला आणि त्याने पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या करण्याचा कट रचला. बिहारमध्ये शिक्षक म्हणून काम करणारा राजीव कुमार याने आपला सहकारी धीरजकुमार रमोदसिंग याला सोबत घेऊन पुणे गाठले. पुण्यात आल्यावर त्याने पत्नीचा प्रियकर प्रवीण कुमार महतोचा पत्ता शोधून काढला. प्रवीण कुमार हा पुण्यातील बावधन येथे त्याच्या भावाच्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता.

राजीवने मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमारवर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. हत्या करून आरोपी राजीवने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला मुंबईकडे जात असताना अटक केली. साथीदार धीरजकुमार यालाही हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. राजीव कुमार कौटुंबिक कलहमुळे तणावात होता. त्याची पत्नी गेल्या तीन-चार वर्षांपासून त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यांची घटस्फोसाठी कोर्टात केस देखील सुरू आहे. अशातच पत्नीचे बॉयफ्रेंड प्रवीण कुमार सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि ते फोटो राजीव कुमारपर्यंत पोहोचले होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button