Crime News : नाशिक पोलिसांचा एरंडोलमधील जुगार अड्ड्यावर छापा; आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…!

Crime News : जळगाव जिल्ह्यात एरंडोलमध्ये राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात १ लाख ३१ हजार १४० रुपये रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News : Nashik Police raid gambling den in Erandol; A case has been registered against eight persons…!

दरम्यान, एरंडोल शहरात इतर ठिकाणी देखील पत्त्यांचे क्लब सुरू असताना केवळ एका क्लबवरच कारवाई करण्यात आली, यावरून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या हॉटेल मयुरी गार्डनमध्ये पत्त्यांचा क्लब चालू असल्याची गुप्त माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयास मिळाली होती.
या माहितीच्या आधारे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या धाडीत पोलिसांनी १ लाख ३१ हजार १४० रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. मात्र, काही जणांनी भिंतीवरून उड्या मारून पळ काढला, त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे.

एरंडोल शहरात एकूण सहा पत्त्यांचे क्लब बिनधास्तपणे सुरू असताना केवळ एका क्लबवरच कारवाई झाल्यामुळे नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. इतर क्लब चालकांवर देखील पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यामुळे जोर धरू लागली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button