Crime News : जळगावच्या ‘एलसीबी’ने अट्टल चोरट्यांकडून सव्वाचार लाखांच्या १० मोटारसायकल केल्या जप्त…!

Crime News : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याअनुषंगाने चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार ‘एलसीबी’च्या पथकाने अट्टल चोरट्यांना जेरबंद करून सुमारे ४ लाख ३३ हजार रूपयांच्या मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

Crime News : Jalgaon’s ‘LCB’ seized 10 motorbikes worth four lakhs from Attal Chorta…!

पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व दत्तात्रय पोटे, पोलिस हवालदार गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णू बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजित जाधव, राहुल महाजन यांचे पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, पथकातील हवालदार विनोद पाटील यांना टाकरखेडा (ता.जामनेर) येथील विशाल गोपाल भोई हा चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

खात्री करण्यासाठी नमूद पथकातील अंमलदाराने टाकरखेडा जाऊन विशाल भोई यास ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर आणि सुरज अशोक पारधी (साळुंखे) दोन्ही रा.टाकरखेडा हे त्याचे साथीदार असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने दोघांना जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ३३ हजार रूपये किंमतीच्या १० मोटार सायकली जप्त केल्या. उर्वरित दोन मोटारसायकलींचा शोध घेतला जात आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात आधीच पाच गुन्हे दाखल झाले होते. त्याचप्रमाणे जळगाव शहर पोलिस ठाण्यात आणि भुसावळ शहर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झालेला होता.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button