Crime News : गावठी कट्टा बाळगणाऱ्या कानळद्याच्या इसमाला जळगावच्या ‘एलसीबी’ने घातल्या बेड्या…!
Crime News : जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीच्या पथकाने कानळदा (ता.जळगाव) येथील एका इसमाला गावठी कट्टा बाळगल्याच्या प्रकरणावरून अटक केली आहे. सुहास भरत बावीस्कर (वय ३८) असे त्याचे नाव आहे. संबंधितावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी पारोळा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Crime News : Jalgaon’s ‘LCB’ put shackles on Isma from Kanaldya, who was carrying a gavathi katta…!
जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगत असल्याने त्यांच्यावर गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अनिल जाधव, हवालदार दीपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदिप चवरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, सुहास बावीस्कर (रा.कानळदा ता. जि.जळगाव) हा त्याचे गावठी कट्टा ( पिस्टल) घेवून दहशत माजविण्याचे उद्देशाने देवगाव (ता.पारोळा) येथे आला आहे. त्यावरून देवगाव शिवारात जाऊन मिळालेल्या बातमीची खात्री करून सुहास बावीस्कर यास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. नाव आणि गाव विचारले असता त्याने सुहास भरत बावीस्कर (वय ३८, रा. कानळदा)असे सांगीतले. त्यावरून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात १५,०००/- रु. किमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्टल तसेच ४,०००/- रु. किमतीचे २ जिवंत काडतुस मिळून आले. त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पारोळा पोलिस ठाण्यात CCTNS NO २९२ / २०२४ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकिय तपासणी करून सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर गुन्ह्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.