Crime News : शस्त्राचा धाक दाखवून शेळ्या व बोकड चोरणारी टोळी जळगावच्या ‘एलसीबी’ने केली जेरबंद…!

Crime News : जळगाव जिल्ह्यात शेळ्या चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संशयितांचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एलसीबी’च्या पथकाने शस्त्राचा धाक दाखवून शेळ्या व बोकड चोरणारी एक टोळी जेरबंद केली आहे. संबंधितांकडून १ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे.

Crime News : Jalgaon’s ‘LCB’ arrested a gang stealing goats and bucks by showing fear of weapons…!

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी उपनिरीक्षक गणेश वाघमारे व दत्तात्रय पोटे, हवालदार संदिप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी यांचे पथक शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी नेमले होते. सदर पथकातील अधिकारी व अंमलदारांना चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेळ्या व बोकडांची चोरी करणारा संशयित चेतन गायकवाड (रा.भवाळी) हाच असल्याची माहिती मिळाली होती. खात्री करण्यासाठी एलसीबीच्या पथकाने दोन दिवस पाळत ठेवली. अखेर गुरूवारी (ता.०३) चेतन गायकवाड आणि त्याचे साथीदार भवाळी गावात आले. ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी पोलिसांना त्यांचे इतर साथीदार गोरख गायकवाड, बबलू जाधव, गोरख गोकूळ, सोमनाथ गायकवाड, गोकूळ गायकवाड व शंकर मोरे (सर्व रा.भवाळी) यांची नावे सांगितली.

गुन्ह्यातील दोन संशयित पळून जाण्यात ठरले यशस्वी

सर्व संशयित आरोपी हे चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे परिसरात मजुरीच्या कामानिमित्त नेहमी जात होते. दरम्यान, त्याठिकाणी त्यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या असल्याची माहिती मिळाली होती. एके दिवशी शेडवर शेळ्या राखणाऱ्या इसमाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून चेतन गायकवाड व त्याच्या सोबतच्या साथीदारांनी १९ बोकड आणि ७ शेळ्या चारचाकी वाहनात टाकून चोरून नेल्या होत्या. चोरलेले बोकड व शेळ्या विकून मिळालेली रक्कम नंतर आपसात वाटून घेतली होती. एलसीबीच्या पथकाने पोलिसी खाक्या दाखवून चेतन गायकवाड व त्याच्या अन्य ४ साथीदारांकडून शेळ्या विकून मिळालेली रोख १ लाख ९ हजार रूपये रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली २६ हजार रूपये किंमतीची दुचाकी जप्त केली. गुन्ह्यातील दोन संशयित गोकूळ गायकवाड व शंकर मोरे हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याही विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button