Crime News : जळगाव शहरात गेल्या सहा महिन्यात महिलांवरील बलात्काराच्या आठ घटना उघडकीस…!

Crime News : कोलकाता तसेच बदलापुरात अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. अनेक ठिकाणी बलात्कारासह विनयभंगाच्या घटना उघडकीस देखील येऊ लागल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातही गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल आठ बलात्काराच्या खळबळजनक घटना उघडकीस आल्या आहेत. याशिवाय २१ जणींचा विनयभंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Crime News: Jalgaon exposes incidents of torture against six women…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगाव शहरातील लखपती दीदी कार्यक्रमात भाषण करताना कोलकाता आणि बदलापूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी या घटनांबद्दल खेद व्यक्त करताना स्पष्टपणे सांगितले की, दोषी कोणत्याही परिस्थितीत सुटू नये. अशा क्रूर आणि अमानवी कृत्यांना मुळातून संपवणे हे आपल्या समाजाचे आणि सरकारचे कर्तव्य आहे, असे मोदी यांनी ठासून सांगितले. पंतप्रधानांनी राज्य सरकारांना स्पष्ट आदेश दिले की, अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड किंवा उदासीनता नको. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा घटनांमुळे देशातील महिला आणि मुलींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यासाठी समाजानेही जागृत होऊन महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी

दरम्यान, जळगाव शहरात जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत महिलांवरील बलात्काराचे एकूण आठ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय विनयभंगाच्या २१ घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर दाखल गुन्हे उघड सुद्धा झाले आहेत. मात्र, महिलांसह मुलींवरील बलात्कारासह विनयभंगाच्या घटनांनी शहर व परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा तसेच महाविद्यालये. देवस्थाने व बसस्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी तातडीने पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी त्यामुळे पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button