Crime News : चोपडा तालुक्यात माणुसकीला फासला काळीमा; १२ वर्षीय मुलीला अत्याचार करून दगडाने ठेचले !

Crime News : चोपडा तालुक्यातील विरवाडे-मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना तिच्या लहान बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश पूना बारेला (वय २२) याला अटक देखील केली आहे.

Crime News : In Chopda taluka, 12-year-old girl was tortured and crushed with a stone in the field!

शेतातील काम करून घरी परतत असताना ही निर्दोष मुलगी आणि तिची लहान बहीण एका क्रूर मानवाच्या हव्यासाची बळी ठरली. शेतातील काम आटोपून मालापूर विरवाडे रस्त्याने आपल्या विरवाडे गावाकडे दोन्ही बहिणी निघाल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी मुकेश पूना बारेला (वय २२) याने एका शेतात ओढून मोठ्या बारावर्षीय बहिणीवर अत्याचार केला. त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारून टाकले. ही घटना तिच्यासोबतच्या लहान बहिणीने पाहिल्यानंतर सर्व हकीकत विरवाडे गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर गावकरी तिचा शोध घेऊ लागले. याच रस्त्यावर गूळ मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळील पाटचारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीडिता विवस्त्र सापडली. तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या

घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला होता. मात्र, तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर तो चोपडा-आडगाव रस्त्यावर पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिकारी कविता नेरकर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button