Crime News : नंदुरबारमध्येही सफाई कर्मचाऱ्याकडून पाचवीच्या वर्गातील मुलीचा अश्लिल व्हिडीओ दाखवून विनयभंग !
Crime News : बदलापुरातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच नंदुरबारमधील एका शाळेत घडलेल्या घटनेने समाजाला हादरवून सोडले आहे. शाळेत काम करणाऱ्या एका ५० वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या निष्पाप मुलीचा विनयभंग केला आहे. २७ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत सफाई कर्मचाऱ्याने आपला मोबाईल तिच्याकडे नेऊन इंटरनेट सुरू करून देण्याची मागणी केली. त्या निमित्ताने त्याने मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा घृणास्पद प्रकार केला.
Crime News: Even in Nandurbar, a cleaning worker molested a fifth class girl by showing an obscene video!
तक्रार दाखल होताच नंदुरबार पोलिसांनी सफाई कर्मचार्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील केली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी दिली. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिक्षणाच्या मंदिरात अशा प्रकारच्या गैरकृत्याला थारा देणे म्हणजे समाजातील मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासारखे आहे. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेचे ठिकाण असावे, परंतु अशा घटनांमुळे पालकांची चिंता वाढत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये प्रचंड चिंता आणि असंतोष
नंदुरबारमधील शाळेत घडलेल्या घृणास्पद घटनेनंतर पीडित मुलगी जेव्हा घरी गेली, तेव्हा तिने आपल्यासोबत काय घडले हे आपल्या पालकांना सांगितले. आपल्या मुलीच्या तोंडून हा प्रकार ऐकल्यावर पालकांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी तात्काळ शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनाला या प्रकाराबद्दल जाब विचारला. पालकांनी व्यवस्थापनाकडून या घटनेबाबत खुलासा मागितला तसेच शाळेतील सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले. पालकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित सफाई कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली, ज्यामुळे आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये प्रचंड चिंता आणि असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल होताच तात्काळ कारवाई केली असून, आरोपी सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.