Crime News : भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल; कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर सामूहिक अत्याचार…!

Crime News : नालासोपारा येथे घडलेल्या धक्कादायक सामूहिक अत्याचार प्रकरणात २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक नेत्यासह तिघांवर करण्यात आला आहे. आरोपींमध्ये भाजपाचे वसई-विरारचे जिल्हा उपाध्यक्ष आणि उत्तर भारतीय मोर्चाचे प्रभारी गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांच्यासह त्यांची पत्नी आणि सहकारी नवीन सिंग यांचा समावेश आहे.

Crime News : Case registered against three including BJP leader; Gang rape of young girl by putting drug in cold drink…!

पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तिघांनी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यामाध्यमातून पीडितेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील संशयितांवर करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आचोळे पोलीस करत आहेत आणि गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दंत चिकित्सकाला अटक

दुसऱ्या एका घटनेत नालासोपारा येथेच एका दंत चिकित्सकाने अल्पवयीन मुलीवर चार वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या मते, पीडित मुलीचे आई-वडील हयात नाहीत आणि ती चार वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या संपर्कात आली होती. डॉक्टरने मुलीच्या निराधार अवस्थेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. आरोपी डॉक्टर योगेंद्र शुक्ला याला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button