Crime News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अडचणीत ? मुलाची भरधाव ऑडी कार अनेक वाहनांना धडकली…!
Crime News : नागपूरमध्ये भरधाव ऑडी कारने काही दुचाकी आणि चारचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. ही कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. धडक दिल्यानंतर कारचा चालक आणि त्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय असून, त्याला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात बावनकुळेंचा मुलगा संकेत गाडीत होता का, याचीही चौकशी सध्या सुरू आहे.
Crime News: BJP state president Bawankule in trouble? The boy’s speeding Audi car collided with many vehicles…!
नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या ऑडी कारने अपघात केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. चालक अर्जुन याने एका उभ्या कारला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ऑडी कार जप्त केली आहे, मात्र कारची नंबर प्लेट काढून ठेवण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच आता संशय व्यक्त केला जात आहे. जितेंद्र सोनकांबळे यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावरून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
या प्रकरणावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कबूल केले आहे की, “गाडी माझ्या मुलाच्या नावे आहे, पण पोलिसांनी कोणत्याही दबावाला न जुमानता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.” त्यांनी यावरही जोर दिला आहे की, “मी कुठल्याही पोलिस अधिकाऱ्याशी याबाबत संवाद साधलेला नाही.” सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.