Crime News : चोपडा तालुक्यात १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या; नराधमास ७ दिवसांची पोलिस कोठडी..!

Crime News : चोपडा तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुकेश बारेला या संशयित आरोपीला अटक केल्यानंतर अमळनेर येथील न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Crime News : A 12-year-old girl was tortured and crushed with a stone in Chopra taluka; Murderer 7 days police custody..!

दिवसभर शेतात काम करून दोन्ही बहिणी मालापूर विरवाडे रस्त्याने आपल्या विरवाडे गावाकडे निघाल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी मुकेश पूना बारेला (22) याने एका शेतात ओढून पैकी १२ वर्षीय मुलीवर जबरदस्ती अत्याचार केला. त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारून टाकले. ही घटना तिच्यासोबतच्या लहान बहिणीने पाहिल्यानंतर सर्व हकीकत विरवाडे येथील गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर गावकरी तिचा शोध घेऊ लागले. दरम्यान, गूळ मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळील पाटचारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीडिता विवस्त्र सापडली. तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत पीडित मुलीवर शवविच्छेदनानंतर रविवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात आरोपी मुकेश बारेला याच्या विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत बलात्कार व हत्येचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी अमळनेर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्याकडे पुढील तपासासाठी त्याला सुपुर्द करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र वल्टे यांनी दिली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button