सराईत गुन्हेगार ‘भासा’वर जळगावच्या पोलिसांनी टाकला फासा, एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव टुडे । शहरातील औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार भूषण उर्फ भासा विजय माळी (वय 24, तुकारामवाडी) याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी त्याच्या हद्दपारीचे आदेश काढले होते. दरम्यान, भासाची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Crime News)

भूषण उर्फ भासा विजय माळी याच्या विरुद्ध एकूण 13 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याने तुकारामवाडी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशत माजवली होती. त्यामुळे त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार देखील करण्यात आले होते. प्रत्यक्षात हद्दपारीनंतरही त्याने जळगाव शहरात गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले होते. तुकारामवाडी परिसरात त्याने साथीदारांसह एका घरात घुसून तोडफोड केली होती. त्याच्या विरोधात औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याकडून एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आला. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले. त्यानुसार भूषण माळीला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button