भुसावळ हत्याकांड…संतोष बारसेंच्या शरीरात चार, सुनील राखुंडेंच्या शरीरात निघाल्या पाच गोळ्या !

जळगाव टुडे । भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष राखुंडे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांची बुधवारी (ता.29) रात्री दहाच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या मृतदेहाचे गुरुवारी (ता.30) जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले होते. दरम्यान, बारसे यांच्या शरीरातून चार आणि राखुंडे यांच्या शरीरातून पाच गोळ्या निघाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. (Crime News)

भुसावळमधील खळबळजनक हत्याकांड प्रकरणानंतर मयत संतोष बारसे यांचा लहान भाऊ मिथू बारसेच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पैकी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी तसेच विनोद चावरीया आणि अन्य काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. उर्वरित संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची हत्या सतारे भागातील मरीमाता मंदिरासमोर घडली आहे. ज्या कारमध्ये सदरचे हत्याकांड घडले ती कार राखुंडे हा चालवत होता, तर बारसे हे त्याच्या शेजारच्या शीटवर बसलेले होते. हत्याकांडातील मारेकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्या आधारे पुढील तपासाला गती देण्यात येत आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर भुसावळ शहरातील नागरिक सध्या प्रचंड दहशतीखाली वावरत असून, तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button