भुसावळमध्ये पुन्हा गँगवार…बुधवारी रात्री पूर्ववैमनस्यातून दोघांची गोळी घालून हत्या !

जळगाव टुडे । काहीना काही कारणावरून सातत्याने गँगवारच्या घडत असल्याने प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या जिल्ह्यातील भुसावळमध्ये आज बुधवारी (ता.29) रात्री दहाच्या सुमारास दोघांची गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबारात जागीच मृत्युमुखी पडलेल्या दोघांमध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. अन्य एक जण जखमी झाला आहे. (Crime News)

भुसावळ शहरातील नवीन सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ सदरची गोळीबाराची घटना घडली असून, मारेकऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे घटनस्थळी पोहोचले असून, मृतांच्या नातेवाईकांसह समर्थकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले आहे. मारेकरी कोण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संतोष बारसे यांचे वडील मोहन मुनीर बारसे यांचाही धारदार शस्त्राने भोसकून शहरातील वर्दळीच्या जामनेर रस्त्यावरील वाल्मीक चौकात काही वर्षांपूर्वी खून झाला होता. त्यानंतर आता संतोष बारसे यांचीही गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button