जळगाव पोलिसांची मोठी कारवाई…रामदेववाडी अपघातात चार जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही संशयितांना घेतले ताब्यात

उद्या शुक्रवारी न्यायालयात हजर करणार

जळगाव टुडे । रामदेववाडी (ता.जळगाव)येथे 7 मे रोजी घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोन्ही संशयित तरूणांवर इतके दिवस कोणतीच कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. मात्र, जळगाव पोलिसांनी उशिरा का होईना मोठी कारवाई केली आहे. चार जणांचा बळी घेणाऱ्या कारमधील दोन्ही संशयित तरूणांना गुरुवारी (ता.23) मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांमध्ये बिल्डरसह एका राजकारण्याच्या मुलाचा समावेश आहे. दोघांना शुक्रवारी (ता.24) जळगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Crime News)

धनदांडग्यांची मुले चालवित असलेल्या भरधाव कारने उडवल्याने रामदेववाडी (ता.जळगाव) येथे एका महिलेसह तिची दोन मुले आणि भाच्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना घडली होती. संबंधित कारचालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला असला, तरी पोलिसांना त्याचा शोध अद्याप घेता आलेला नाही. दरम्यान, सदरचे प्रकरण जिल्ह्यातील राजकारण्यांकडून दडपले जात असल्याचा आरोप रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी केला होता. पोलिसांवर देखील तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता.

रामदेववाडीतील चौघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या कारमध्ये जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार तसेच शासकीय कंत्राटदार अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल हा देखील होता. परंतु, पोलिसांनी फक्त कार चालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अन्य दोघांवर कोणताच गुन्हा दाखल केला नव्हता. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी त्यामुळे लोकसभा निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकला होता.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, रामदेववाडीतील चौघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या कारमधील दोन्ही तरुणांवर दुखापत झाल्याने मुंबईत उपचार सुरू होते. आज गुरुवारी रूग्णालयातून सुटी मिळताच जळगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सायंकाळपर्यंत ते जळगावमध्ये पोहोचतील. दोघांवर आधीच भादंवि 304 नुसार गुन्हा दाखल होता, त्यात आता पुन्हा एमडी क्लेमची कलमे वाढविण्यात आली आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button