जळगावच्या सौरभ ज्लेलर्समध्ये धाडसी दरोडा, 300 ग्रॅम सोने व 60 हजार रूपये लंपास

जळगाव टुडे । शहरातील सराफ बाजारात असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये सोमवारी (ता.20) पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत धाडसी दरोडा टाकला. चोरट्यांनी अंदाजे 300 ग्रॅम सोने तसेच 60 ते 70 हजार रूपये रोख रक्कम, असा मुद्देमाल लुटून नेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांकडून तपासाची चक्रे गतीमान करण्यात आली आहेत. (Crime News)

महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स नावाचे सराफ बाजारात दुकान आहे. सोमवारी पहाटे चार ते साडेचार वाजता तीन दुचाकींवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात सहा लुटारूंनी मुख्य चॅनेल गेटचे व दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश केला व लाकडी दरवाजाच्या छोट्या खिडकीतून ते आतमध्ये गेले. दुकानाच्या आतमध्ये आधीच दोन जण झोपलेले होते. सर्व सहा दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत त्यांना शांत राहण्याविषयी सांगितले आणि आपला कार्यभाग साधला. त्यानंतर 300 ग्रॅम वजनाचे सोने, त्याचप्रमाणे 60 ते 70 हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

सौरभ ज्वेलर्समध्ये दरोड्याच्या घटनेनंतर पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी

दरम्यान, दरोड्याची घटना घडल्यानंतर कामगारांनी दुकानाचे मालक महेंद्र कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा पडल्याची माहिती दिली. कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच होते. मात्र, बाहेरच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सर्व सहा जण कैद झाले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच सहायक पोलिस अधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली असून, शनिपेठ पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button