नंदुरबारच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव टुडे । नंदुरबार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी (वय 50, रा.नंदुरबार, मुळ रहिवाशी मुक्ताईनगर, जि. जळगांव) यांना तक्रारदाराकडून 50 हजार रूपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. संबंधित शिक्षणधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. (Crime News)

तक्रारदाराला नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. 826, सीटी सर्वे क्र. 624, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाची होती. मात्र, त्या परिसरात 75 मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL 3 परवाना देण्यास हरकत घेतली होती. परंतु सदर शाळा इमारत बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देणेसाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून 50 हजाराची मागणी करण्यात आली.

पंच साक्षीदारांचे समक्ष संशयित शिक्षणाधिकाऱ्याला जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button