जळगाव शहरात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय महिलेवर बलात्कार | Crime News

Jalgaon Today : जळगाव शहरातील २३ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी (ता.0३) रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल ठाण्यात करण्यात आला. (Crime News)

जळगाव शहरातील २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ८ मार्च २०२३ रोजी महिलेची ओळख विकास प्रकाश अडकमोल (वय २३, रा. गेंदालाल मिल) याच्याशी झाली. त्याच ओळखीचा फायदा घेत विकासने महिलेशी जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कालांतराने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास देखील सुरुवात केली. नेहमीचा हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन विकास अडकमोल याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी रात्री १० वाजता संशयित आरोपी विकास अडकमोल याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे हे करीत आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button