रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग शिवारात सव्वासहा लाखांचा 91 किलो गांजा जप्त

Crime News : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सबस्त्रलिंग शिवारात एका शेतात गांजाची लागवड करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करुन एकुण सुमारे 6 लाख 21 हजार 520 रुपये किंमतीचा 91 किलो 400 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अक्रम कासम तडवी, शाहरुख कासम तडवी (दोन्ही रा. सहस्त्रलिंग) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी आरोपी शाहरुख तडवी यास अटक झाली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस उप निरीक्षक सचिन नवले हे करीत आहेत.

पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती की, लालमाती ते सहस्त्रलिंग गावांचे रस्त्यालगत एका शेतात गांज्याच्या झाडाची लागवड करुन त्याची जोपासना केली जात आहे. त्यानुसार निरीक्षक डॉ. जयस्वाल, सहाय्यक निरीक्षक आशिष अडसुळ, उपनिरीक्षक सचिन नवले, हवालदार ईश्वर चव्हाण, नाईक जगदीश पाटील, कल्पेश आमोदकर, कॉन्स्टेबल मुकेश मेढे, महेश मंगलदास मोगरे, विकारोद्दीन गयासोद्दीन शेख, प्रमोद सुभाष पाटील, समाधान कौतीक ठाकुर, सचिन रघुनाथ घुगे, सुकेश शब्बीर तडवी, संभाजी रघुनाथ बिजागरे व तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, दोन पंच, फोटोग्राफर, वजन काटा मालक, अशा पथकाने जाऊन सहस्त्रलिंग (ता रावेर) येथे जाऊन आरोपी नामे (1) अक्रम कासम तडवी, ( 2 ) शाहरुख कासम तडवी यांच्या मालकीच्या शेतात गांज्याची लागवड मिळून आली. सदर कारवाईमध्ये गांज्या सदृष्य एकुण 91 किलो 400 ग्रॅम वजनाची झाडे जप्त करण्यात आली. 6,21,520 /- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींच्या विरुध्द पोना जगदीश लिलाधर पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (ब), 20 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक जळगांव डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि आशिष अडसुळ, पोउपनिरीक्षक सचिन नवले पोहेकॉ ईश्वर चव्हाण, पोना जगदीश पाटील, पोना कल्पेश आमोदकर, पोकॉ मुकेश मेढे, पो.कॉ सचिन रघुनाथ घुगे, पोकों विशाल शिवाजी पाटील, पो.कॉ प्रमोद सुभाष पाटील, पो.कॉ महेश मंगलदास मोगरे, पो.कॉ समाधान कौतीक ठाकुर, पो.कॉ संभाजी रघुनाथ विजागरे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button