जळगाव तालुका पोलिसांची अवैध खनिज वाहतुकीच्या विरोधात धडक कारवाई
तीन ट्रॅक्टर जप्त करून दोघांना अटक
Crime News : तत्कालिन डीवायएसपी आप्पा पवार यांच्या कार्यकाळात जळगाव तालुका पोलिस ठाण्याने अवैध खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, त्यांनी पदभार सोडल्यापासून कारवाईचे सत्र थांबल्याने संबंधितांचे चांगलेच फावले होते. मात्र, आता पुन्हा पोलिस सक्रीय झाले असून धडक कारवाईत तीन ट्रॅक्टर जप्त करून दोघांना अटक देखील करण्यात आली आहे.
जळगाव तालुका पोलिस ठाण्याला मिळालेल्या गुप्त बातमीवरून अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर निरीक्षक महेश शर्मा यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले. त्यानंतर सदरच्या पथकाने अवैध गौण खनिजाच्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये एकुण 03 गुन्हे दाखल केले. त्यात 03 ट्रॅक्टर वाहने जप्त करुन संशयित आरोपी अजय भाईदास भिल (वय-22 रा,आसोदा, ता. जि जळगाव) तसेच बळवंत गौरव बाविस्कर (वय-35, रा.पुनगाव, ता.चोपडा) यांना सदर गुन्हयात अटक केली आहे.
पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश शर्मा, पोहेकॉ रामकृष्ण इंगळे, पोहेकॉ प्रविण पाटील, पोहेकॉ अनिल मोरे, पोहेकॉ अशोक पाटील, पोना नरेंद्र पाटील, पोना मनोज पाटील, पोकॉ अभिषेक पाटील, पोकॉ भूषण सपकाळे व पोकॉ श्याम पाटील यांनी सदरची कारवाई केली आहे.