शिरसोलीत शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक, पाच ते सहाजण जखमी

Crime News : तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर गुरुवारी (ता.28) रात्री उशिरा अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत सुमारे पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 ते 12 जणांना ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते. गुरुवारी देखील (ता.28) संध्याकाळी शिरसोलीच्या इंदिरानगर येथून ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक निघाली होती. दरम्यान, रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्लीत आल्यावर काही काळ ढोलताशे बंद करण्यात आले. त्याचवेळी अचानक जवळील प्रार्थनास्थळावरून अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. यामुळे मिरवणुकीतील तरुण जखमी झाले. काहींच्या घरावर देखील दगड पडल्याने विशाल दिलीप पाटील (वय 25, रा. शिरसोली) हा जखमी झाला.

एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह ५ ते ६ जण जबर जखमी आहेत. घटनास्थळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व एलसीबीचे पोलिस निरीक्षक नजन पाटील हे सुद्धा पोहोचले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button