अमळनेरच्या सायलेन्सर चोर टोळीतील तिघांना जळगावच्या ‘एलसीबी’कडून अटक
Crime News : जळगावच्या ‘एलसीबी’ला अमळनेर शहरातील मनीष उर्फ सनी महाजन हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने मारुती सुझकी कंपनीच्या इको गाडीचे सायलेन्सर चोरी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खात्री झाल्यानंतर अमळनेर येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. चौथा आरोपी सध्या नाशिकच्या कारागृहात आहे.
मिळालेल्या गुप्च बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करणेबाबत जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी हवालदार संदिप पाटील, कमलाकर बागुल, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकास रवाना करुन पुढील कारवाईसाठी आदेशित केले होते. त्यानुसार वर नमुद पथकाने अमळनेर शहरात जावून मिळलेल्या बातमी प्रमाणे मनीष उर्फ सनी रविंद्र महाजन (रा.शिरुड नाका, श्रीराम कॉलनी अमळनेर) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे सोबत साथीदार शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील (रा. राजाराम नगर अमळनेर) तसेच निखील संतोष चौधरी (रा. राजाराम नगर अमळनेर) यांना देखील ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचा अजून एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी (रा. रामेश्वर कॉलनी अमळनेर) याचेही नाव सांगितले. तो सध्या नाशिक जेलमध्ये आहे. नमूद तिन्ही आरोपींना ताब्यात घेवून पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी अमळनेर पो.स्टे.चे
1) CCTNS NO 578 /2022, IPC 379, 2) CCTNS NO 591 / 2022, IPC 379, 3) CCTNS NO 47/2023 IPC 379, 4) CCTNS NO 135/2023, IPC 379, 5) CCTNS NO 504 / 2023 IPC 379 या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच आरोपी मनीष उर्फ सनी रविंद्र महाजन याचेकडून एक चोरीची मोटार सायकल मिळाली असून, सदर मोटार सायकलीबाबत तपास केला असता नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.