मोठी बातमी….मुक्ताईनगर तालुक्यात लोकसभा निवडणूक नाकाबंदीत 20 लाखांचे सोने पकडले

Crime News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या नाकाबंदीत एका व्यापाऱ्याकडे सुमारे 20 लाख रूपये किंमतीचे 279.730 ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. पोलिसांनी सदरचे सोने जप्त केले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी हस्तांतरीत केले आहे.

जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी करण्यात आली होती. सदरच्या नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धुमगहू, हवालदार छोटू वैद्य, प्रशांत चौधरी, प्रवीण जाधव, अभिमन पाटील यांना एक संशयित कार येताना दिसली. पथकातील पोलिसांनी कार थांबवून तपासणी केल्यावर आतमध्ये भवरलाल जेठमल जैन (रा. जळगाव) यांच्या बॅगेत 279.730 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वस्तू (अंदाजे किंमत 20 लाख रूपये) कोणत्याही पावतीशिवाय विना परवाना आढळून आल्या. त्यानंतर सदरचे सोने फिरते पथक प्रमुख असिस्टंट इंजिनिअर अनिल नेरपगार, पंचायत समिती, बोदवड यांना बोलावून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हस्तांतरीत करण्यात आले. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि नागेश मोहीते, सपोनि संदीप धुमगहू, पो.हवा.छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत चौधरी, पोशि. प्रविण जाधव, पोशि. अभिमण पाटील नेम मुक्ताईनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button