वन विभागाने अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्यावर दाखल केला गुन्हा

Crime News : यावल तालुक्यात मोहराळा ते कोरपावली रस्त्याने वाहन चालक खलील रफिक तडवी (रा. कोरपावली) हा अवैधरित्या लाकूड वाहतूक करीत होता. वन विभागाच्या पथकाने सदर इसमाविरुध्द वन अपराध अन्वये गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगाव यांनी दिली आहे.

उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव यांच्याकडून मिळालेल्या गुप्त बातमीवरून मोहराळा ते कोरपावली रस्त्यावर वनपथक दबा धरुन बसले होते. दरम्यान, वाहन चालक खलील रफिक तडवी (रा. कोरपावली) एका ट्रॅक्टरमध्ये अंजन, नीम इमारतीचे अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. वाहन चालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याने वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे जमा करण्यात आले. पुढील कार्यवाही यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जखीर एम. शेख तसेच सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील भिलावे, यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे आणि त्यांचे अधिनस्थ कर्मचारी केली जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button