पोलिसांचा धाक संपला, जळगाव जिल्ह्यात कापूस व्यापाऱ्याचे दीड कोटी रूपये लुटले

Crime News : पोलिसांचा धाक संपल्याने जिल्ह्यात दिवसाढवळ्या हाणामारी, पाकीटमारी तसेच दुचाकी चोरीच्या घटना नित्याच्या झालेल्या असताना, कापूस व्यापाऱ्याचे सुमारे दीड कोटी रूपये लुटल्याची थरारक घटना जळगाव- धरणगाव रस्त्यावर मुसळी फाट्याजवळ भरदिवसा घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इंपेक्स या जिनिंगची रक्कम घेऊन व्यापारी जळगावहून पिंप्रीकडे येत होते. दरम्यान, मुसळी फाट्याजवळ उड्डाणपुलाच्या खाली व्यापाऱ्याची गाडी येताच बोलेरो कारमधून समोरून आलेल्या तीन अज्ञात लुटारूंनी व्यापाऱ्याची गाडी अडवली. मिरचीची फूड फेकून आतमध्ये बसलेल्या कॅशियरच्या मांडीवर त्यांनी चाकुने वार करीत सुमारे दीड कोटी रूपयांची रक्कम हिसकावून जळगावच्या दिशेने पोबारा केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत लुटारू पसार होण्यात यशस्वी झाले होते.

पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात लुटारूंच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांचे पथक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन तपासाला लागले आहे. दरम्यान, मुसळी फाट्यावर कापूस व्यापाऱ्याचे दीड कोटी रूपये लुटण्यात आल्यानंतर परिसरातील जिनिंग चालकांचे धाबे दणाणले आहे. या भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी देखील केली जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button