भुसावळ तालुक्यात कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या 11 जणांना मुद्देमालासह अटक
Crime News : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा गावात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या 11 जुगाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 हजार रुपयांच्या 2 फायटर कोंबड्यांसह 5 लाख 86 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसा ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना गोपनीय माहिती मिळानुसार, भुसावळ तालुक्यात कुऱ्हा या गावी एका शेताच्या बाजूला सार्वजनिक जागी झुडपाजवळ 15 ते 16 इसम हे कोंबड्यांच्या झुंज लावून त्यावर पैशांचा हार-जीतचा खेळ खेळताना दिसून आले. त्यांच्याकडून 2 हजार रुपये किमतीचे फायटर कोंबडे, 3 हजार 600 रुपये रोख, मोबाईल फोन आणि 14 दुचाकी, असे मिळून 5 लाख 86 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संशयित आरोपी शहीद शेख सादिक (वय 23), शेख जावेद शेख (वय 38), आशिष राजेश सोनी (वय 21), नेल्सन लेनिन पेट्रो (वय 43), शेख आरिफ शेख युसुफ (वय 31), मोहसीन शेख (वय 32), सलमान शेख सलीम (वय 26), रशीद सय्यद निसार (वय 42), अर्जुन बादल गरड (वय 24), शेख इमाम शेख (वय 38) आणि इतर पाच ते सहा जण यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, विठ्ठल फुसे, पोहेकॉ सुरज पाटील, संकेत झांबरे आदींनी केली आहे.