Crime News : शिक्षिकेने विद्यार्थ्यांना २ लाखांची सुपारी देऊन २५ वर्षीय प्रियकराचा केला खून…!

Crime News : सततच्या धमक्यांना कंटाळून शिक्षिकेने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे दोन लाख रूपयांची सुपारी देऊन २५ वर्षीय प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना नाशिक शहरात घडली आहे. याप्रकरणी शिक्षिकेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime News: The teacher killed the 25-year-old lover by giving 2 lakhs betel nut to the students!

भावना कदम या ४० वर्षीय विवाहित शिक्षिकेचे गगन कोकाटे या निवृत्त पोलिसाच्या २५ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. इतरांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सदर तरुण शिक्षिकेला सतत व्हिडिओ कॉलवर विचारणा करत असे. तसेच दोघांमधील अनैतिक संबंध तिचा पती व मुलीला सांगण्याची धमकी द्यायचा. त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी अखेर शिक्षिकेने आपल्या माजी विद्यार्थ्याला २ लाखांची सुपारी दिली. त्यानंतर सुपारी घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्या तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मेरी परिसरात उघडकीस आला.

कोरोना काळात सुरू झाले होते दोघांचे प्रेमसंबंध

वृंदावन नगर, म्हसरूळ येथील रहिवासी गगन कोकाटे आणि एका खासगी संस्थेच्या रात्र महाविद्यालयात कंत्राटी शिक्षिका असलेल्या भावना कदम यांच्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा प्रेमसंबंध २०२० मध्ये कोरोना काळात दूध घेण्यासाठी गगन नियमित भावनाच्या घरी जात असताना सुरू झाला होता. दूध वाल्याकडून भावनाचा नंबर घेऊन गगनने भावनाशी संपर्क साधला आणि या दोघांमध्ये मैत्री झाली, जी नंतर प्रेमात बदलली. मात्र, गगनला भावना ही अन्य तरुणांसोबतही अनैतिक संबंध ठेवत असल्याचा संशय होता. त्याच संशयातून तो भावना कदम यांना सतत व्हिडीओ कॉल करून सतावत होता.

सुपारी घेणाऱ्या विद्यार्थ्याने सातपूर परिसरात पाडला तरुणाचा मुडदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने नंतर त्या तरुणासोबत संपर्क तोडला होता. मात्र, तो तिला धमक्या देत होता की, तो तिचे अनैतिक संबंध तिच्या पती आणि मुलीला सांगेल. या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या शिक्षिकेने आपला माजी विद्यार्थी संकेत रणदिवे याला त्या तरुणाचा खून करण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी दिली. संकेत रणदिवे याने संशयित गौतम दुसाने, श्रावण आहेर, रितेश सपकाळे, यश खैरनार, मेहफुज सय्यद यांना प्रत्येकी २० हजार रुपये देऊन तरुणाचा खून करण्याचे षडयंत्र रचले व सातपूर परिसरात त्याचा मुडदा पाडला. पोलिस चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, महेश नांदुर्डीकर यांच्या पथकाने सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button