Crime News : बदलापुरातील चिमुकलींवरील अत्याचाराची घटना नेमकी कशी उघडकीस आली ?

Crime News : बदलापुरातील आदर्श विद्यालयात दोन चिमुकलींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, सदर शाळा ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची असल्याने आरोपीवर कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आदर्श शाळेच्या प्रशासनावरही चिमुकलींवरील अत्याचाराचे प्रकरण दाबल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Crime News: How did the incident of child abuse in Badlapur come to light?

आदर्श शाळेत तीन वर्षांच्या दोन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पीडित बालिका लघुशंकेसाठी गेल्या असता, शाळेतील 22 वर्षीय सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर मुलींना खूप वेदना होत होत्या. त्यांनी घरी येऊन आपल्या पालकांना सांगितले की, त्यांना सू-सूच्या ठिकाणी खूप दुखत आहे. यामुळे पालकांनी तातकाळ डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पीडित मुलींच्या पालकांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात उदासीनता दाखवली आणि पालकांना १२ तास वाट पाहावी लागली.

विरोधी पक्षांकडून सत्ताधारी भाजपवर मोठी आगपाखड

दरम्यान, हलगर्जीपणा करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर राज्य शासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आदर्श विद्यालय ही शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित असल्याने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई झालीच कशी, असा प्रश्न आता उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. संस्था चालकांना कसे वाचवता ?, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनीही केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझे मनसेच्या सैनिकांना सांगणे आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत तुमचे लक्ष असू द्या, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button