Crime News : बहिणीवर वाईट नजर ठेवल्याच्या संशयातून सावत्र बापाची मुलाने संतापात केली हत्या…!

Crime News : मुंबईतील टिटवाळा जवळच्या एका गावात घडलेली धक्कादायक घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेत एका मुलाने आपल्या सावत्र वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागील कारण सावत्र वडिलांची मुलीवर वाईट नजर असल्याचा संशय आहे. याच संशयातून मुलाने सदर गुन्हा केला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Crime News: The stepfather was killed by his son in anger on the suspicion of keeping an evil eye on his sister!

टिटवाळा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला असून, सावत्र बापाची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. कल्याण-टिटवाळा परिसरातील घडलेल्या या घटनेत हार्डवेअरच्या दुकानात काम करणारे कदीर सिद्दीकी यांची त्यांच्या सावत्र मुलानेच निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कदीर सिद्दीकी हे आपल्या कुटुंबासोबत टिटवाळा परिसरात राहत होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेला पहिल्या पतीपासून कबीर सिद्दीकी हा एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये होती. मात्र, रविवारी रात्री कदीर सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास सुरू करून टिटवाळा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. कदीर सिद्दीकी यांचा सावत्र मुलगा कबीर सिद्दीकी आणि त्याचा मित्र अल्ताफ शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांची (कदीर सिद्दीकी) आपल्या बहिणीवर वाईट नजर आहे, असा संशय कबीर सिद्दीकी याला होता. त्याच संशयातूनच त्याने आपल्या मित्राच्या मदतीने सावत्र वडिलांची धारधार शस्त्राने हत्या केली. टिटवाळा पोलिसांनी आरोपींची कबुली घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button