Crime News : कामावरून घरी परतणाऱ्या नर्सवर अत्याचार; त्यानंतर केली निर्घुण हत्या..!
Crime News : कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या सामुहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच, कामावरून घरी परतणाऱ्या एका नर्सची अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक आणखी एक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित नराधमाला बेळ्या घातल्या आहेत. धर्मेंद्रकुमार असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
Crime News : Assault on nurse returning home from work; After that he committed a brutal murder..!
उत्तराखंडच्या उधमसिंह नगर येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सवरील बलात्कार आणि हत्येच्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी राजस्थानातून आरोपी धर्मेंद्र कुमारला अटक केली आहे. पोलिसांच्या मते, पीडित नर्स काम संपवून घरी जात असताना धर्मेंद्रने तिचा पाठलाग केला आणि तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. पीडित नर्सच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीचा शोध सुरू केला. तपासातून धर्मेंद्र कुमार हा या गुन्ह्यात गुंतलेला असल्याचे निष्कर्ष निघाला. त्याला राजस्थानातून तातडीने अटक देखील करण्यात आली.
पोलिसांना बेपत्ता नर्सचा मोबाईल फोन सापडला राजस्थानात
पीडित नर्स बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या बहिणीने दिल्यानंतर पोलिसांनी शोधासाठी विशेष पथक तयार केले होते. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, हल्ला होण्यापूर्वी नर्स एका गावात गेली होती. त्यानंतर सुमारे आठवडाभराने तिचा मृतदेह एका मोकळ्या मैदानात आढळून आला. मृतदेहाची ओळख पीडित नर्स म्हणून पटली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उजेडात आली. नर्सचा मोबाईल फोन राजस्थानात सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले. या फुटेजमध्ये आरोपी नर्सचा पाठलाग करताना स्पष्टपणे दिसत होता.