Crime News : सासरच्या लोकांकडून जावयाची विजेचा शॉक देऊन हत्या; पत्नीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल !
Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सासरच्या लोकांनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या क्रूर हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वसंत भगे यांची पत्नी आणि तिच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरच न्यायालयीन कारवाईसाठी हजर केले जाणार आहे.
Crime News : Son-in-law killed by electric shock by in-laws; A case has been filed against the wife and mother-in-law!
वसंत उर्फ सागर भगे हा कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील रहिवासी असून, त्याची हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. वसंत आणि त्याची पत्नी नुतन यांच्यात काही कारणास्तव वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे नुतन आपल्या माहेरी गेली होती. १२ ऑगस्ट रोजी नुतनने वसंतला आपल्या माहेरी बोलावले. मात्र, या भेटीच्या मागे एक भयंकर कट रचला गेला होता. वसंत जेव्हा आपल्या पत्नीला भेटायला गेला तेव्हा संशयितांनी त्यांच्या घराच्या भोवती असलेल्या कंपाऊंडमध्ये विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले होते. वसंतचा या तारांशी स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा शॉक बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वसंतच्या भावाने विजेचा शॉक देऊन आपल्या भावाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. वसंतच्या भावाने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी वसंतची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल केला आहे.