Crime News : विधवा वहिनीला लग्न करून आधार देणाऱ्या दिराची घरच्यांनीच केली निर्घृण हत्या…!
Crime News : एका इसमाने आपल्या भावाच्या मृत्यूनंतर समाजातील रीती-रिवाज आणि कुटुंबाच्या विरोधानंतरही आपल्या विधवा वहिनीला आधार देण्यासाठी तिच्याशी विवाह केला. मात्र, या एका निर्णयाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याचा थेट बळी घेतला. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील ही धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Crime News: Dira, who supported widowed sister-in-law by marrying her, was brutally murdered by her family members!
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सैन गावात ही क्रूर घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. रामकुमार महतो नावाच्या इसमाने आपल्या विधवा वहिनीशी लग्न केल्यामुळे त्याला आपल्या कुटुंबीयांकडून जीवघेणी शिक्षा भोगावी लागली आहे. रामकुमार हा सायन गावचा रहिवासी होता. आठ वर्षांपूर्वी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील किशूनपूर मोहिनी गावातील नीतूसोबत त्याचा विवाह झाला होता. नीतूचे वडील राजकिशोर सिंह यांनी आपल्या जावयाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलीचा दुसरा विवाह तिचा दीर रामकुमार सोबत मोठ्या आनंदाने लावून दिला होता.
मृतदेह चादरीत गुंडाळून घरापासून ५०० मीटर अंतरावर बागेत फेकून दिला
रामकुमारने आपल्या विधवा वहिनीशी लग्न केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याच्याशी दुर्व्यवहार करण्यास सुरुवात केली. अखेरीस कुटुंबीयांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेह चादरीत गुंडाळून घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बागेत फेकून दिला. ही क्रूर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. रामकुमारचा मेहुणा विकास कुमार याने दिलेल्या माहितीनुसार विधवा वहिनीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळेच त्याच्या कुटुंबीयांनी जीव घेतला. पतीच्या निधनानंतर नीतू दोन वर्षे सासरी राहिली होती. अशा वेळी रामने आपल्या विधवा वहिनीशी लग्न केले, पण राम आणि नीतूच्या लग्नामुळे त्याचे कुटुंबीय आनंदी नव्हते. ते त्यांना सतत टोमणे मारायचे, त्रास द्यायचे. काही वेळा तर त्याचे कुटुंबीय दोघांनाही मारहाण करायचे. आपल्या जावयाची त्याच्या घरच्यांकडून हत्या करण्यात आली आहे, असा आरोप रामच्या सासरच्या लोकांनी केला आहे.