Crime News : धुळे जिल्ह्यातील नगाव शिवारात चहाच्या हॉटेलजवळ तरुणीने भरदिवसा पेटवून घेतले !
Crime News : धुळे शहराजवळील नगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर चहाच्या हॉटेलजवळ एक तरुणी जळालेल्या अवस्थेत आक्रोश करत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्या तरुणीला वाचविण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली व तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. रूग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी देखील तिला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Crime News: A young woman set herself on fire in broad daylight near a tea hotel in Nagaon Shivar in Dhule district!
जळीत तरुणी कोण आहे, हे ओळखण्यासाठी तपासणी केली असता तिच्याजवळील बॅगमध्ये सापडलेल्या मोबाईल आणि आधार कार्डावरून तिची ओळख पटली. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना या दु:खद घटनेची माहिती दिली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. रक्षिता पाटीदार असे नाव त्या तरूणीचे असून, ती इंदूर येथील रहिवासी होती. रक्षिता पुण्यातील एका कंपनीत नोकरीला होती आणि रक्षाबंधन तसेच २० ऑगस्टला तिचा वाढदिवस असल्याने ती घरी इंदूरला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सने निघाली होती. मात्र, इंदूरला पोहोचण्याऐवजी सकाळी ६.३० वाजता ती धुळ्यात उतरली. तिने महामार्गावरील एका पेट्रोल पंपावरून बाटलीत डिझेल खरेदी केले, आणि त्यानंतर पेट्रोल पंपापासून ५०० मीटर अंतरावर तिने स्वतःला पेटवून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिच्या जवळील बॅगमधून सापडलेल्या मोबाईल आणि आधार कार्डावरून तिची ओळख पटवण्यात आली.
रक्षिताचा २० ऑगस्टला साजरा होणार होता वाढदिवस
मृत रक्षिता पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होती आणि तिच्याजवळ त्या कंपनीचे ओळखपत्र सुद्धा आढळून आले. दरम्यान, रक्षिताचा येत्या मंगळवारी २० ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे तिला आई-वडिलांनी घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. दुर्दैवाने वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच रक्षिताला अग्निडाग देण्याची वेळ तिच्या माता-पित्यावर व नातेवाईकांवर आली आहे.