Crime News : शरीर संबंधाला नकार देणाऱ्या ९ महिलांची हत्या करणारा मनोरूग्ण नराधम अखेर झाला जेरबंद !
Crime News : शरीर संबंधाला नकार देणाऱ्या अनेक महिलांची निर्दयीपणे हत्या मनोरूग्ण नराधमाने केल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. त्यास पोलिसांनी तातडीने अटक केली असून, उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये त्यामुळे मोठी खळबळ देखील उडाली आहे. त्या नराधमाचे नाव कुलदीप असे आहे. गेल्या १४ महिन्यात त्याने तब्बल ९ महिलांची साडीने किंवा दुपट्ट्याने गळा आवळून क्रूर हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
Crime News: The psychopath who killed 9 women who refused to have sex was jailed!
कुलदीपचे वडील बाबूराम यांनी त्याची आईची हयात असतानाच दुसरे लग्न केले होते. कुलदीपच्या म्हणण्यानुसार, सावत्र आईच्या सांगण्यावरून त्याचे वडील बाबूराम हे त्याच्या खऱ्या आईला आणि तसेच त्याच्या बहिणींनाही मारहाण करायचे. वडिलांच्या या क्रूरतेमुळे त्याच्या खऱ्या आईसह दोन्ही बहिणींचा नंतर मृत्यू झाला. या घटनांमुळे कुलदीपच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण झाला आणि तो तेव्हापासून असामान्य वर्तन करू लागला. दरम्यान, २०१४ मध्ये कुलदीपचे लग्न झाले. परंतु काही दिवसांनी तो अधिक हिंसक झाला. त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्रस्त होऊन ती त्याला सोडून निघून गेली. मग त्याने जंगलात आणि निर्जन ठिकाणी राहायला सुरुवात केली. पायी भटकणे, विचित्र वर्तन करणे हे त्याच्या जीवनाचे भाग बनले.
एकट्या महिलेला शेतात ओढत नेऊन साडीने किंवा दुपट्ट्याने करायचा हत्या
अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यावर त्याने ४५ ते ५५ वयोगटातील महिलांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. एकट्या महिलेला शेतात ओढत नेऊन तिची साडीने किंवा दुपट्ट्याने हत्या तो सर्रासपणे करू लागला. कुलदीप महिलांना निर्जनस्थळी फसवून नेत असे आणि तिथे त्यांना बंधक बनवून शारीरिक संबंधांची मागणी करायचा. जर पीडितांनी विरोध केला, तर तो त्यांचा गळा साडी किंवा दुपट्ट्याने आवळून त्यांचा खून करायचा. या अमानवी कृत्यानंतर कुलदीप त्या महिलांच्या काही वस्तू आपल्या सोबत ठेवायचा. त्यात सिकल, लिपस्टिक, बिंदी किंवा आधारकार्ड यांसारख्या वस्तूंचा समावेश असे. त्याच्या या विचित्र आणि भयानक वर्तनामुळे अनेक निर्दोष महिलांचा जीव गेला.