Crime News : धनादेशाचा अनादर केल्याने जळगावच्या माजी नगरसेवकास सहा महिन्यांची शिक्षा !

Crime News : वाळू उत्खननापोटी दिलेला धनादेश न वटल्याने जळगाव शहरातील माजी नगरसेवक अजय राम जाधव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. याशिवाय जाधव यांना सुमारे २६ लाख ९८ हजार आणि १० हजार रुपये, असा दोन प्रकारचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. त्यामुळेच सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

Crime News: Jalgaon former corporator sentenced to six months for dishonoring a cheque!

शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथील वाळू गटातून सन २०१६-१७ मध्ये सुनंदाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक सुधाकर पाटील यांना वाळू उपशाचा परवाना मिळाला होता. या वाळू गटातून पाटील यांच्यासह अजय राम जाधव यांनीही वाळू वाहतूक केली होती. उसनवारीने देण्यात आलेल्या उत्खननापोटी जाधव यांच्याकडे असलेल्या १९ लाख ७५ हजार रुपयांपैकी त्यांनी फक्त ७५ हजार रुपये दिले. त्यानंतर जाधव यांनी त्यांच्या मे.साई एंटरप्राईजेस या संस्थेचा १९ लाख रुपयांचा धनादेश दीपक पाटील यांना दिला. मात्र तो बँकेत वटलाच नाही. त्यामुळे दीपक पाटील यांनी अजय जाधव यांच्या विरोधात धनादेशाचा अनादर केला म्हणून न्यायालयात खटला दाखल केला होता.

अशी आहे सुनावण्यात आलेली शिक्षा व दंडाची रक्कम

त्या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्या.व्ही.एम.देशमुख यांनी अजय जाधव यांना सहा महिने कारावास, २६ लाख ९८ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची शिक्षा सुनावली. दीपक पाटील यांच्यावतीने अॅड.मुकेश शिंपी, ॲड.स्वाती भोयर यांनी काम पाहिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button