Crime News : प्रियकराकडून प्रेमविवाहानंतर काही तासांतच प्रेयसीची कुऱ्हाडीने हत्या, स्वतःलाही संपविले !
Crime News : कर्नाटकच्या कोलारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये प्रेमविवाह झाल्यानंतर काही तासांतच प्रियकराने प्रेयसीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या भयंकर घटनेनंतर आरोपीने स्वतःवरही कुऱ्हाडीचे वार करून स्वतःला देखील संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
Crime News: The boyfriend killed his girlfriend with an ax within a few hours of the love marriage, also killed himself!
कर्नाटकच्या कोलारमध्ये नवीन कुमार आणि लिखिता श्री, एकमेकांच्या शेजारील गावात राहणारे होते आणि दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ७ ऑगस्ट रोजी धुमधडाक्यात त्यांचे लग्न लावले, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण होते. मात्र, लग्नानंतर काही तासांतच नवरा-नवरीमध्ये अचानक मोठा वाद झाला. वाद मिटविण्यासाठी ते गावातीलच एका घरात गेले. परंतु अचानक नवीन कुमारने लिखिता श्रीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात ती गतप्राण झाली.
नवीन कुमारने त्याची पत्नी लिखिता श्री हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर, स्वतःवरही कुऱ्हाडीचे घाव घातले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. बराच वेळ दोघेही कुठे दिसत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला. त्यावेळी ते एका घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. ही भयंकर दृश्य पाहून कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी तत्काळ दोघांनाही जवळच्या रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केले. त्यानंतर, गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान नवीनचा सुद्धा मृत्यू झाला.