Crime News : अल्पवयीन भाचीला गर्भवती करणाऱ्या नराधम मामाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या !
Crime News : नोएडाच्या सेक्टर-३९ परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी तिच्या मामाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. महिनाभरापूर्वी आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. कुटुंबीयांनी तक्रार केल्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली.
Crime News: Police handcuffs the murderous uncle who impregnated the minor niece!
मुलीला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता, तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या धक्कादायक निष्कर्षामुळे पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आणि आरोपीचा शोध घेतला. मुलीच्या जबानीनुसार आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे पोलिसांनी एफआयआरमध्ये लैगिंक अत्याचाराचे कलम जोडले. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. या घटनेने समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणांनी समाजाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई होऊन आरोपींना कडक शिक्षा होणे अत्यावश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
नोएडाचे एसीपी प्रवीण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की त्यांची १६ वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आणि माहितीच्या आधारे रविवारी सेक्टर-३७ बसस्थानकाजवळून मुलीला ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत मुलीने सांगितले की, तिचा मामा सौरभ याने तिचे अपहरण केले होते. गुरुग्राममध्ये राहणारा सौरभ हा पीडितेच्या आईचा चुलत भाऊ असल्यामुळे तो मुलीचा मामा म्हणून ओळखला जातो. या नात्यावरून त्याने तिचे अपहरण केले आणि लैगिंक अत्याचार केला.