Crime News : सुट्टीवर आलेल्या जवानाला पत्नी आणि तिच्या प्रियकराने हातपाय बांधून विष पाजले !

Crime News : जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावणाऱ्या सैन्य दलातील जवानावर पत्नी आणि तिच्या प्रियकराने विषप्रयोग केल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी जवानाचे प्राण वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कोल्हापुरात संताप व्यक्त केला जात आहे. जवानाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरावर पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर देसाई असे मृत जवानाचे नाव आहे.

Crime News: A jawan who came on vacation was killed by his wife and her lover by tying his arms and legs and poisoning him!

जवान अमर देसाई हे जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत होते आणि गेल्या महिन्यात सुट्टीवर घरी आले होते. मात्र, सुट्टीवर घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने झोपेत असताना हातपाय बांधून त्यांना विष पाजण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असताना अमर देसाई यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे शेजारी राहणारे लोक त्यांच्या मदतीला धावले. शेजाऱ्यांनी तात्काळ अमर देसाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

मदतीला धावलेल्या शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला

जवान अमर देसाई यांचेवर विषप्रयोग केला जात असताना, शेजारी राहणारे काही लोक त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्याचवेळी पत्नीच्या प्रियकराने घरात आलेल्या व्यक्तीला जोरदार धक्का दिला आणि तिथून पळ काढला. शेजारच्यांनी अमर देसाई यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले तसेच त्यांच्या पत्नीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी जवानाच्या मृत्युला कारणीभूत ठरलेली पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासाला गती दिली आहे. दरम्यान, जवानाची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्यानंतर कोल्हापुरात खळबळ उडाली असून घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button