Crime News : राजकीय वैमनस्यातून महिला सरपंचांच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या !
Crime News : करंजखेडा (ता.कन्नड) येथे गुरुवारी राजकीय वैमनस्यातून विद्यमान महिला सरपंचांच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. खून झालेल्या तरुणाचे नाव नीलेश कैलास सोनवणे (वय ३३) असे आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. खून झालेल्या तरुणाची आई संगीताबाई सोनवणे या राखीव प्रवर्गातून करंजखेडा गावच्या सरपंच बनल्या आहेत. विरोधी पॅनेलची महिला सरपंच झाल्याचा राग विरोधक भगवान कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांना होता, अशी माहिती मिळाली आहे.
Crime News: The son of a female sarpanch was stabbed to death with a sharp weapon due to political enmity!
संगीताबाई सोनवणे करंजखेडा गावाच्या सरपंच झाल्याचा राग विरोधक भगवान कोल्हे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. यामुळेच सरपंच संगीताबाई सोनवणे आणि भगवान कोल्हे यांच्यात गावातील यात्रेदरम्यान २०२२ मध्ये मानाचा नारळ फोडण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी सरपंच संगीताबाई आणि आरोपी भगवान कोल्हे व इतरांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही या दोन्ही गटांमध्ये विविध कारणांनी अधूनमधून वाद होत राहिले.
नीलेश सोनवणे मक्याच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता
नेहमीप्रमाणे गुरांना चारापाणी करण्यासाठी गेलेला नीलेश बराच वेळ घरी न आल्याने त्याची आई सरपंच संगीताबाई, त्यांचे पती त्याला बघायला शेतात गेले होते. दरम्यान, रस्त्याने त्यांना आरोपी मयूर सोळुंके, विजय वाघ व इतर चार जण हे सर्व जण गावाकडे जातांना दिसले. शेतात पोहचल्यानंतर नीलेशची दुचाकी बांधाच्या कडेला पडलेली आढळून आली. आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला असता तो मक्याच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याच्यावर आरोपींनी धारदार शस्त्राने वार केलेले होते. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.