Crime News : पत्नीने पहिल्या लग्नाचा मुलगा घरी आणला; संतापलेल्या सावत्र बापाने त्याचा मुडदाच पाडला !

Crime News : ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या सावत्र मुलाचा शारीरिक छळ करून हत्या करणाऱ्या वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांना त्याला अटक केली आहे. मुलाची आई काही दिवसांपूर्वीच कोलकाताहून आपल्या लग्नाच्या मुलाला घेऊन आली होती. दुसऱ्या लग्नानंतर आपल्या मुलाचे आयुष्य चांगले होईल, अशी अपेक्षा तिने केली होती. परंतु तिच्या नवऱ्याने तिच्या मुलावर अत्याचार करून त्याची हत्या केली.

Crime News : Wife brings son from first marriage home; The angry stepfather killed him!

ठाणे जिल्ह्यातील चितळसर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाच्या आईने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आरोपीसोबत दुसरे लग्न केले होते. नव्या पतीसोबत ती राहत असताना, काही आठवड्यांपूर्वी ती तिचा चार वर्षांचा मुलगा मोहम्मद आर्यन याला कोलकाताहून तिच्या घरी घेऊन आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला आपल्या पत्नीच्या पहिल्या लग्नापासून मुलगा असल्याची माहिती नव्हती. मुलाला घेऊन आल्यापासून पती-पत्नीमध्ये भांडणे सुरु झाली होती. संतापलेल्या आरोपी दिलशादने सावत्र मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता.

पोलिसांकडून तपास कार्याला वेग

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संतापलेल्या दिलशादने आपल्या साडेचार वर्षाच्या सावत्र मुलाची निर्घुण हत्या केली. या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना समाजात संताप निर्माण करणारी ठरली आहे. मुलाची आई अत्यंत दु:खात आहे. आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी तिने कोलकाताहून त्याला आणले होते, परंतु या क्रूर घटनेमुळे ती हादरली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मुलाची आई आणि इतर कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत.

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलावर गंभीर शारीरिक अत्याचार..

अल्पवयीन मुलाच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालात मुलावर गंभीर शारीरिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलाच्या बरगड्या आणि हाडे अनेक ठिकाणी तुटलेली असल्याचे आणि पोटात अंतर्गत जखमा आढळून आल्या आहेत. या भयानक माहितीमुळे पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (हत्या) अंतर्गत चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button