Crime News : दाऊद शेख यानेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून यशश्री शिंदेचा केला खून ? पोलिसांना शंका !
Crime News : उरण शहरातील एनआय स्कूलजवळ राहणारी २२ वर्षीय यशश्री शिंदे ह्या तरुणीचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ काल रविवारी आढळून आला होता. हत्येपूर्वी मारेकऱ्याने यशश्रीचा प्रचंड छळ केल्याचे उत्तरीय तपासणी स्पष्ट झाले आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमा आढळल्या असून, स्तन कापले होते आणि चेहरा सुद्धा दगडाने ठेचून विद्रूप केलेला होता. दरम्यान, संशयित दाऊद शेख यानेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून यशश्री शिंदेचा खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Crime News: Dawood Sheikh killed Yashshree Shinde by dragging him in the trap of love? Doubt the police !
यशश्री शिंदे आणि तिच्या कुटुंबीयांकडून सन २०१९ मध्ये दिलेल्या तक्रारीवरून दाऊद शेख याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी यशश्रीचे वय अवघे १४ ते १५ वर्षे होते. यामुळे दाऊद शेख बराच काळ तुरुंगात राहिला होता. या प्रकरणामध्ये यशश्रीचे वडील सुरेश शिंदे यांनी दाऊद शेख याच्यावर यशश्रीला फसवून तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप लावला आहे तसेच त्यांनी हे प्रकरण लव्ह जिहादशी जोडून तपास करण्याची मागणी केली आहे.
यशश्रीची ओळख पटवणे झाले अवघड
यशश्री शिंदे हिचा शोध सुरू असताना ती दाऊद शेखसोबत असावी, अशी पोलिसांना शंका होती. मात्र, पोलिस तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिची हत्या झाली होती. ही हत्या इतकी क्रूरपणे करण्यात आली होती की, तिची ओळख पटवणे अवघड झाले होते. यशश्री शिंदेचा मृतदेह अत्यंत विद्रूप स्थितीत सापडला होता. तिची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्याने तिच्यावर क्रूर हल्ला केला होता. मृतदेहाची अवस्था इतकी भयानक होती की, कोणाचाही आत्मा हादरावा अशी स्थिती होती. तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक हल्ले केलेले दिसून आले तसेच तिचे हातपाय मोडले होते. धारदार शस्त्राने तिच्या पाठीवर आणि पोटावर अनेक वार करण्यात आले होते. छातीवरही शस्त्राचे असंख्य खुणा होत्या. चेहरा दगडाने ठेचला होता, ज्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले होते.
दरम्यान, २५ जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कॉल रेकॉर्डची तपासणी पोलिसांनी केली. तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली. यशश्री एका विशिष्ट नंबरवर दीर्घकाळ संभाषण करत होती. ती तासन् तास या नंबरवर बोलत असल्याचे आढळले. पोलिसांनी या नंबरचा तपशील तपासला असता, तो दाऊद शेख नावाच्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले.