Crime News : मुलीने आंतरजातीय विवाह केला; वडिलांनी रागाच्या भरात जावयाला संपवले !

Crime News : छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंगची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, आंतरजातीय विवाह केल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबाला राग अनावर झाला होता. मुलीचे वडील आणि चुलत भावाने रागातून जावयाला भररस्त्यावर चाकूने भोसकल्याने त्या तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News : Girl marries inter-caste; father ended the son in law!
अमित मुरलीधर साळुंके या तरुणाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याची हत्या केली आहे. आरोपींची नावे गीताराम भास्करराव कीर्तिशाही आणि अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही अशी आहेत. ही घटना १४ जुलैच्या रात्री शहरातील गारखेडा भागात घडली होती. प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि चुलत मेहुण्याने जावयाला भररस्त्यावर चाकूने भोसकले होते. गंभीर जखमी झालेल्या अमितवर उपचार सुरू होते, परंतु दुर्दैवाने २५ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमितच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमाला होता सुरूवातीपासून विरोध
आरोपींनी अमितच्या पोटात तसेच मांडीवर व हातावर चाकूने वार केले होते. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आरोपी पळून गेले होते. घटनेच्या वेळी आरडाओरड ऐकून अमितचे वडील मुरलीधर साळुंके आणि दुसरा मुलगा सुमीत हे तिकडे धावले. त्यांनी अमितला उचलून घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे अमितने हल्लेखोर सासरा गीताराम भास्करराव कीर्तिशाही आणि चुलत मेहुणा अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही यांची नावे सांगितली होती. मृत अमित आणि त्याची पत्नी बालपणीचे मित्र होते. अमितचे तिच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button