Crime News : ५० हजार रूपयांची लाच घेताना भडगावचा पोलिस हवालदार अडकला जाळ्यात !
Crime News : वाळू वाहतुकीचे आधीच दोन गुन्हे दाखल असतानाही समोरच्या व्यक्तीकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भडगाव पोलीस ठाण्याच्या हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी (दि.२६) भडगाव येथे रंगेहाथ पकडले. किरण रवींद्र पाटील (वय ४१) असे त्या हवालदाराचे नाव आहे.
Crime News: Bhadgaon police constable caught in the net while accepting a bribe of 50 thousand rupees!
तक्रारदार भडगाव येथीलच रहिवाशी आहे. भडगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत किरण रवींद्र पाटील यांनी गुरुवार (दि.२५) रोजी तक्रारदाराकडे वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी २ लाख ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव येथे लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार साफळा रचून किरण पाटील यास रंगहाथ पकडण्यात आले.
दरम्यान, पहिला हफ्ता म्हणून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलिस कॉन्सटेबल राकेश दुसाने, पोलिस कॉन्सटेबल अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाकडून किरण पाटील यास रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशन येथे संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.