Crime News : पत्नीला फोनवरून ‘तलाक’ देणाऱ्या पतीच्या विरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल

Crime News : ट्रीपल तलाक विरोधी कायदा कडक करण्यात आलेला असताना, तोंडी तीनवेळा तलाक बोलून काडीमोड घेण्यास देखील कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही वर्षभरापासून माहेरी पाठवून दिलेल्या पत्नीला मोबाईल फोनवर तलाक देण्याची भाषा करणाऱ्या भडगाव तालुक्यातील पतीच्या विरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: A case has been registered in Jalgaon against the husband who gave ‘talaq’ to his wife over the phone
आसिफ दगा पटेल (रा.वाक वडजी, ता.भडगाव) याचे जळगावच्या शिवाजीनगरातील माहेर असलेल्या शिरीन पटेल हिच्याशी सन २०२१ मध्ये लग्न झाले होते. प्रत्यक्षात शिरीनच्या सासरचे लोक तिला सातत्याने त्रास देत होते. त्यांनी तिला वर्षभरापूर्वीच भांडण करून माहेरी पाठवून दिलेले होते. दरम्यान, १८ जुलै २०२४ रोजी आसिफ पटेल याने शिरीनला मोबाईलवर संपर्क साधून मी तुला तलाक देत असे तीनवेळा बोलून आपले नाते आता कायमचे संपल्याचे सांगितले. त्यानंतर फोन कट करत शिरीनचे काका, आत्या व इतर नातेवाईकांनाही त्याने तलाक घेतल्याचे कळविले.

त्यामुळे शिरीन पटेल व तिच्या नातेवाईकांनी जळगावच्या शहर पोलिस ठाण्याचे दार ठोठावले. त्याठिकाणी आसिफ पटेल याच्या विरोधात ट्रीपल तलाक विरोधी कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button